Pages

Tuesday, August 13, 2013

एका अध्याहृत कवितेच्या आठवणी

एका अध्याहृत कवितेच्या आठवणी

Adam did not want the apple
for the apple's sake.He wanted
it because it was forbidden;
If God had forbidden the serpent
Adam would have eaten the serpent.
१ .
या अभिराम संध्येचे रंग कुठेतरी कोसळत असावेत मित्रा ;
मेघांना हे कळत नाही म्हणून ते आर्जवाची शिल्पे
तोडून फोडून वितळतात;
पायाखाली अपरंपार पाण्याचे पाताळ असूनही घडविलेल्या
प्रतिमांच्या रचनेच्या राखेत मिसळून टाकतात.
असाच का असतो जडात लखाकणारा
अपुला साजाणशोक?
सारणीच्या पुलाशेजारी पाण्याच्या अभंग तुकड्यात
सुर्य इवलासा होतो तेंव्हाही अस्तित्वपेचात
सापडते का हाक ?
सुभाष ! निर्णयाच्या दिवशी आपण सारेच तर नागवे
असू /त्याची शरम आत्तापासून कशाला?
गव्हाचा दाणा नागवा पेरला तरी वस्त्र घेऊनच
उगवतो .
-ग्रेस/सांध्यपर्वातील वैष्णवी

No comments: