Pages

Tuesday, August 13, 2013

स्मृतिगंध

स्मृतिगंध

तू उदास मी उदास मेघहि उदासले
स्म्रुतितील विदग्ध नाद पैंजणात सांडले...

तुझ्या तनुंत चंद्रशिल्प सांजली निळी जळे
जसा समुद्र आंधळा नि सूर्य दूर मावळे ...

मंद मंद वाहते दिव्यांतली अनंतता
तुझ्या सुखांस गंधवित लोचनि नीजे कथा...

अंगणात ये सजुन मृत्यु रोज एकला
पावसाळी ये जसा नदीस पुर सावळा ...

कुठे धुक्यात चाललीस गर्दले नभावारी
विश्वमंद्ल्या दिठित रात्र थांबली जरी...

ग्रेस...
संध्याकाळच्या कविता...

No comments: