Pages

Tuesday, August 13, 2013

सूक्त पहिले :

सूक्त पहिले :

खिडकितून बघतो मी
लिम्बाचे झाड़ कंच;
पानावर थेम्बांचा
पावसाळी शुभ्र संच.

खिडकितून बघताना
पड़वी का थरारते?
झरझरती गाय चिम्ब
आत्म्यातुन हम्बरते.

लिम्बाचा मोहरही
कोकिळेस स्निग्ध दिसे;
आकाशी एक दोन
अभ्रांचे शुभ्र ससे...

पहिलटकर पाउस हा
पृथ्वीचा घेत कौल;
आई जरी शेतावर,
पाळण्यात स्तब्ध मूल.

झाडांचा बीजमंत्र
सुन्न कळया, दिव्य फूल;
जाताना पड़ते का
सर्वाना हीच भूल?

-ग्रेस

No comments: