Pages

Tuesday, August 13, 2013

घर

घर

दुरून दिसतात अदृश्य सीमेसारख्या
टेकड्यांच्या ओळी .
क्षितिजाच्या सहवासामुळे त्यांचाही
रंग निळाच भासतो.
मधोमध लांबच लांब मैदान पसरले आहे,मोकळे.
दक्षिणेकडील टोकांवर बंगल्यांची आरास,
तिथून जरासे दूर , पायवाटेला,
चर्चमधील सायान्घान्तेच्या अंतरावर
तुझे घर उभे आहे;
मालकंसाच्या अवरोहात उतरणाऱ्या
गंधारासारखे...
तुझ्या मुद्रेवरील संवेदनांच्या उदास
ओळी माझ्यापर्यंत येऊ लागतात,
तेंव्हा डोळ्यांतील बाहुल्यांच्या ज्योतीसाठी
मीही क्षणभर स्थिरावतो
मावळता दिवड आणि सावल्यांचे प्रदेश
सांधणाऱ्या संधीप्रकाशासाराखा....

ग्रेस

No comments: