Pages

Tuesday, August 13, 2013

डॉ. झिवेगोची कविता

तू येऊन जा. मी घरी नसेन. खुणेच्या
दगडाला किल्ली ठेवलीच आहे.
दुपारचे जेवणही टेबलावर मांडून
ठेवले आहे.
तुला हवी असलेली डब्लू . बी.यीट्सची
कविता;तिच्या कांतारब्रह्माची टाचणे
गुरुचरित्राच्या सहाव्या अध्यायात सुरक्षित
ठेवली आहेत.
मला उशीर होईल. वाटले तर थांब
नाहीतर खुशाल निघून जा
टेनिस कोर्टवर

मी माशांच्या शिकारीला जाणार आहे.
परस्पर लायब्ररीतून. येताना रात्र
होईल.दाराला कडी घालू नकोस.
ते फ़क़्त लोटून घे … तुझ्या स्वप्नांना
स्पर्श केल्याचे तुला आवडत
नाही म्हणून.
-डॉ. झिवेगोची कविता /राजपुत्र आणि डार्लिंग

No comments: