Pages

Tuesday, August 13, 2013

माशांचे डोळे

माशांचे डोळे
१.
मी लहान होतो तेंव्हापासून आवडतात
मला माशांचे डोळे.
काल संध्याकाळी असेल कदाचित
एका मैत्रिणीने आपल्या माशांचे
काचघर दाखविले मला
का कुणास ठाऊक अन मला हृदयभर
रडू कोसळले.
ती गच्चीवरून वाळूत खेळणारी मुले
पाहत होती मजेत.
२.
ती म्हणते,माझ्या त्रिज्येत आभाळा सकट
भगवा मेघही यावयास हवा.
असे कसे होईल ?
विषुववृत्तावराचा मासा तुम्हाला रंगाचे
गाणे म्हणून दाखवील ?
तिचे पत्र इतक्यात नाही आले.
३.
तिची भेट झाली म्हणजे मी तिला दाखवीन
डोस्टोव्ह्स्कीचे जुगारी हात,
शिताफीने निसटलेल्या केरेमोझोव्ह बंधूंची कथा
शिवाय एका मायाळू विधवेची उपोदबलक पुरवणी:
चोलीशिवाय पातळानेच अंग झाकण्याचा तिचा
निग्रही हट्ट ;तेवढ्या रात्री सगळ्या माशांचे
डोळे खुडून ती स्टेशनवर गेली होती...

ग्रेस

No comments: