Pages

Tuesday, August 13, 2013

चन्द्रविद्येचा शोध

शेवटी तुझे पत्र, त्याचे तुकडे तुकडे करून मी कुंडीत पुरून टाकतो कुंडी माझ्या बसण्याच्या खुर्चीजवळ आणून ठेवतो.उन्हाच्या किरणांसाठी खिडकीवरचा पडदा सारतो. पुढेमागे कुंडीत आठवणीने पाणी टाकीनच. कारण ते रत्नकिटाळाचे का असेना,त्याच्या बीजसंभवाचे मला महत्व आहे.थोड्या वेळाने माझे फिडल काढेन. मोझार्ट ची एक हिमशालीन सिम्फनी आहे ती फिडलमधून बोच्या सहाय्याने पिळून काढण्याचा प्रयत्न करेन . या क्रियेला थोड्या दु:खाची गरज पडली तर ओळी आहेतच -
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते कि परतायची घाई
मेंदूतून ढळली माझ्या निष्पर्ण तरुंची राई
माझ्या सैरभैर मनोगतांची रुजुवात होईपर्यंत तू मात्र इथे येऊ नकोस. जिथे आहेस तिथेच थांब . माझी आंधळी कोशिंबीर मला एकट्यालाच खेळू दे. एक सांगायचे राहून गेले रुक्मिणी!
----And above all, my poetry is like a sad evening rainbow of August, which unites both of my strenuous worlds:the world of lyrical madness and the world of requiem..

-ग्रेस /मितवा/चन्द्रविद्येचा शोध

No comments: